आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसाचे निलंबन:हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ करणे अमरावतीतील पोलिसाला चांगलेच महागात, केली निलंबनाची कारवाई

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका

सध्या सोशल नेटवर्किंगवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण हे व्हिडिओ शेअर करत असतता. मात्र अमरावतीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याला अशाप्रकारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले. या व्हिडिओ प्रकरणी पोलिस खात्याने कठोर कारवाई केली आहे आणि त्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.

पोलिस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन या कर्मचाऱ्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये हा पोलिस कर्मचारी डायलॉगबाजी करत पिस्तुल दाखवताना दिसत आहे. हे डायलॉग झाल्यानंतर तो कर्मचारी मोटरसायकलवरुन उठून पुढे चालू लागतो आणि व्हिडिओसंपतो. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला यानंतर पोलिस खात्याने याची दखल घेतली आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही पोलिस खात्यात कामाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महेश मुरलीधर काळे असे त्यांचे नाव आहे.

शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका
या व्हिडिओवरुन पोलिस विभागाने कठोर कारवाई केली आहे. ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका या पोलिस कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे, तसेच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...