आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या
अंबादास दानवे म्हणाले, अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहेत,त्याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात का? तसेच अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत,त्यामुळे शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करणं आवश्यक असून त्याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात का?
देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
अकोला, बीड सारख्या जिल्ह्यात महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींवर घडलेले प्रकार दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून यावर कठोर निर्बंध लावण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्ती करण्याबाबत सूचना केली जाईल व शक्य असल्यास मदत दिली जाईल.
गुड टच बॅड टच धडे देणार
अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत गुड टच बॅड टचचे पोलीस दिदींकडून धडे देण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध व शाळेतील सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची कमिटी तयार करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.