आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर बॉम्ब ठेवला असून तेथे बॉम्बस्फोट होणार आहे, असा निनावी फोन नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, या फोन काॅलशी नागपुरचा काहीही संबंध नाही अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या शहर नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती दिली. ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचताच खळबळ उडाली होती.
याविषयी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यामध्ये नागपुरचा काहीही संबंध नाही असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. डायल 112 पोलिस नियंत्रण कक्ष नसून काॅल सेंटर आहे. प्राथमिक काॅल सेंटर नवी मुंबईत आणि सेकंडरी लकडगंज, नागपूर येथे आहे. या दोन्ही काॅल सेंटरमध्ये राज्यभरातून काॅल येतात. येथे काॅल घेणाऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठून काॅल येत आहे आणि येणारा काॅल कोणत्या पोलिस युनिटशी संबंधित आहे हे माहिती होते. त्या आधारे संबंधित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते.
समन्वयाने काम करू
दुपारी 1 वाजता आलेला काॅल मुंबईशी आणि सायंकाळी आलेला काॅल नवी मुंबई पोलिसांशी संबंधित होता. त्यामुळे त्याची माहिती त्यांना देण्यात आली असे सीपी यांनी सांगितले. नागपुरात जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या निमित्त कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागपुरात सौंदर्यीकरण सुरू आहे. ज्या ठिकाणी भिक्षेकरी राहतात. त्याठिकाणाबाबत पोलिस आयुक्तांशी बोलून समन्वयाने काम करू अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.