आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीजी भारताचे राष्ट्रपिता:अमृता फडणवीस यांचे वक्तव्य; म्हणाल्या - महात्मा गांधीजी तेव्हाचे अन् हे आताचे

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपती आहेत, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलेय. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. विशेष म्हणजे अमृता फडणवीस या सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयावर मतप्रदर्शन व्यक्त करतात.

अमृता फडणीस यांनी काही दिवसांपू्र्वी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना विरुद्ध अमृता फडणवीस अशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या होत्या.

नेमके प्रकरण काय?

नागपूरमध्ये एका अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख पुन्हा एकदा राष्ट्रपिता म्हणून केला. अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. त्याच दिवशी तुम्ही त्यांना राष्ट्रपिता आहे, असे म्हणालात. माझा आरोप असा आहे की, मोदीजी जर राष्ट्रपिता आहेत, तर महात्मा गांधी कोण आहेत?

अमृतांचे उत्तर काय?

अमृता फडणवीस यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे माझे ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत. हे नवीन भारताचे आणि ते तेव्हाचे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही अनेक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्या चर्चेतही होत्या. आता त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरूय.

बातम्या आणखी आहेत...