आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघासह केंद्रावर टीका:जाती-जातीत, धर्मा-धर्मात भयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात परस्पर अविश्वास आणि जाती-जातीत, धर्मा-धर्मात भयाचे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारी पातळीवरूनच हा प्रत्यत्न केला जात आहे. लव्ह जिहाद, हिजाब, भाेंगे, हनुमान चालिसा याला झणझणीत हिंदुत्वाची फाेडणी आणि “हिंदू खतरे में है’च्या सातत्याने चहुबाजूकडून उठवण्यात येणाऱ्या आराेळ्या हिंदूंची घटती व मुस्लिमांची वाढती लाेकसंख्या याची भीती दाखवून स्त्री म्हणजे मशीन आणि पुरुष म्हणजे त्या मशीनवर काम करणारा कामगार असे बिंबवले जात आहे.

देशात ‘भ्रमित करावे सकळ जन’चा रेशीमबाग पुुरस्कृत कार्यक्रम जाेरात सुरू असल्याचा घणाघात ‘गांधी का मरत नाही’ या पुस्तकाचे लेखक १७ व्या विद्राेही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी केला. वर्ध्यातील सर्कस मैदानात विद्राेही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी सरकारला खडे बाेल सुनावत आपण बाेललाे पाहिजे, या गदाराेळात आपली हाेरपळ करून न घेता अन्यायाला वाचा फाेडली पाहिजे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...