आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्सलमध्ये स्फोट:नागपूरच्या मुख्य डाकघरात आलेल्या पार्सलमध्ये स्फोट; कर्मचाऱ्यांत खळबळ, स्फाेट झालेले पार्सल जप्त

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीपीओमध्ये रेल्वे मेल सर्व्हिसचे पार्सल हब आहे. तिथे नाशिकहून बुक झालेल्या एका पार्सलमध्ये मंगळवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्फाेट झालेले पार्सल जप्त केले आहे.

नाशिकमधील एका पोलिस अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटके जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील मुख्य डाकघरात स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा स्फोट मोठा नसला तरी पोस्टात आलेल्या एका पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. स्फोट झालेले पार्सल नाशिकवरून आले होते. पाळीव प्राण्यांकरीता उपयोगात येणारे ज्वलनशील पदार्थ या पार्सलमध्ये होते. जनरल पोस्ट ऑफिसपासून जवळच अनेक मंत्र्यांचे बंगले आणि महत्त्वाच्या खात्याची कार्यालये आहेत. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आले होते. तेच पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमधील रेल्वेच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी ते हाताळत असताना छोटा स्फोट झाला. स्फोटाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पथक तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी वापरले जाणारे स्फोटके सापडली.

बातम्या आणखी आहेत...