आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरावर संतप्त नागरिकांची धडक; नळ कापला म्हणून धरणे, नगरसेवकांसह सर्वांना अटक

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलीही कल्पना न देता पाणी बिल न भरल्याने महापालिकेने नळ जोडणी रद्द केल्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी दुपारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी धडक दिली. पाण्यासाठी आलेल्या या नागरिकांना आयुक्तांनी पोलिस स्टेशन दाखविल्याने नागरिक आणखीच संतापले आहेत. नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, भाजपचे शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर यांच्यासह शेकडो नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विश्वकर्मानगरातील म्हाडा कॉलनीतील पाणी बिलाचा वाद सुरू आहे. म्हाडाने येथील घरांचे पाणी बिल न भरल्याने येथील पन्नासवर घरांमधील नळजोडणी महापालिकेने बंद केली. नागरिकांकडे पाणी न आल्याने खळबळ माजली. नागरिकांनी थेट नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. नगरसेवकांनी भाजप शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर व शेकडो नागरिकांसह दुपारी थेट महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी धाव घेतली. अचानक नागरिकांच्या मोर्चामुळे आयुक्तांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांतही खळबळ माजली.नगरसेवक व नागरिकांनी आयुक्तांच्या घरापुढे ठाण मांडीत घोषणाबाजी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरही तोडगा निघाला नाही, असे नगरसेविका रूपाली ठाकूर यांनी सांगितले. नागरिकांना बिल भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत अधिकाऱ्यांकडे मागितली. त्यांनी होकारही दिला, परंतु आश्वासन न पाळता नळजोडणी बंद केल्याचे नगरसेवक अभय गोटेकर म्हणाले. नागरिकांचे समाधान न करता त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

पाणी दरवाढीविरुद्ध आंदोलनाची तयारी

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्चमध्ये पाण्याच्या दरात ५ टक्के वाढीचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात नागरिकांपुढे आर्थिक संकट असताना पाणी दरवाढ अन्यायकारक असल्याचे नमूद करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात नागपूर विकास परिषदेने १० ऑगस्टला संविधान चौकात आंदोलनाची तयारी केली आहे.

0