आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह जिहाद संदर्भात आपण जनजागृती करीत असून राज्य सभेचे खासदार म्हणून यासाठी कायदा होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी येथे मीडीयाशी बोलताना दिली. आंतरधर्मीय लग्न करून कोणाची फसवणूक होऊ नये, हा आपला मुळ उद्धेश्य असल्याचे अनिल बोंडे म्हणाले. मी कट्टर शिवसैनिक असल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी डोळा मारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टिंगल केली, त्याबद्दल मला खूप वाईट वाटले असेही अनिल बोंडे म्हणाले.
राणांसोबत चांगला संवाद
कधीकाळी शिवसेनेचा राज्यात दबदबा होता. पण आता शिवसेनेच्या स्थितिबद्दल ठाकरेंच्या शिवसैनिकांना काही वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित झाल्याचे बोंडे म्हणाले. अमरावती जिल्ह्यामधील खासदार नवनीत राणा, आमदार बच्चू कडू आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर काम करीत आहोत. त्यामुळे आमच्यात चांगला संवाद असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
15 वर्षातील सर्वोत्कृष्ट बजेट
राज्याचे बजेट हे आतापर्यंतचे गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या इतिहासातील सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट बजेट आहे. त्यासाठी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून हे बजेट तयार केले आणि मांडले. यामध्ये सर्व घटकांचा विचार केला. हे सर्वसमावेश बजेट आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सर्वच घटकांचा विचार केलेला आहे, असे बोंडे यांनी सांगितले.
या बजेटमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्राकडून मिळतेच आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही योजना सुरू केली. म्हणजे आता शेतकऱ्यांना 12 हजार रूपये मिळतील. यामुशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल. आत्महत्या थांबतील, हाच उद्धेश आमचा आहे. लेक लाडकी योजना पहिल्यांदाच महाराष्ट्रात सुरु झाली.
मुलींना शिक्षण आणि पुढील वाटचालीसाठी दिलासा देणारी योजना आहे. असंघटीत कामगारांसाठी योजना आहे. ज्येष्ठांसाठी योजना जाहीर केली. तरुणांनादेखील स्वयं रोजगार, स्वत:च्या पायांवर उभे करण्याचे काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे. उद्योग वाढीसाठी चालना दिलेली आहे”, असे बोंडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.