आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्याची बातमी समजतात नागपुरातील त्यांच्या सिव्हिल लाईनमधील निवासस्थानासमोर पाच पन्नास कार्यकर्त्यांनी येऊन जल्लोषाला सुरूवात केली. पण, लगेचच सीबीआयने दहा दिवस जामीन मिळू नये म्हणून याचिका दाखल केल्याचे कळताच कार्यकर्ते थांबले.
शिवाय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भाषणाच्या थेट प्रसारणाचा कार्यक्रम असल्याने तिकडेही जायचे होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असल्याने कार्यकर्ते तिकडे निघून गेले.
वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखण्यासाठी ख्यात असलेल्या मोजक्या राजकारण्यांत अनिल देशमुखांचे नाव घेतले जात होते. अपक्ष असतानाही ते सत्तेच्या वर्तुळात राहिले. महाराष्ट्रातील पाच सरकारच्या काळात 22 वर्ष मंत्रीपदावर राहण्याची कामगिरी त्यांनी केली. काटोल तालुक्यातील वडविहीरा ते मुंबई असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
कथीत शंभर कोटीच्या वसुली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेतून राजकारणाला सुरूवात केली. नव्वदच्या दशकात ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये काटोल मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढविली. काटोल विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणून आले. आणि त्यानंतर 5 वर्षाचा कालावधी सोडला तर ते 22 वर्ष महाराष्ट्रात मंत्रीपदावर कायम होते.
1995 मध्ये भाजपा सेना युती सरकारच्या काळात त्यांनी शिक्षण, सांस्कृतिक कार्य, अन्न व औषध प्रशासनाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. मात्र 1999 मध्ये काँग्रेस मधून शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन झाला. तेव्हा अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि 1999 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कांग्रेसकडून काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर मात्र त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही.
2014 ते 2019 एवढाच पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांचा राजकीय रिकामपणाचा होता. मात्र, 2019 ला झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. आणि राज्याचे गृहमंत्री झाले. सरकार कोणाचंही असो अनिल देशमुख हे मंत्रीपदावर असणार हे समीकरण महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.