आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या शिक्षण संस्थेला 4.25 कोटी रुपये मिळाल्याचा पुरावा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने नुकतीच अनिल देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील निवासस्थानी झाडाझडती घेतली होती. दिल्लीतील ४ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून अनिल देशमुख संचालक असलेल्या श्री साई शिक्षण संस्थेला सव्वाचार कोटी रुपये मिळाल्याचा पुरावा ईडीला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशमुखांचे कुटुंब या संस्थेच्या संचालक मंडळावर आहे. सूत्रांनुसार, देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांनी हे पैसे हवाला मार्फत मुंबईवरून दिल्ली पाठवले आणि तेथून हे पैसे श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टच्या खात्यात टाकल्याची माहिती आहे.

नागपूरपासून ४० किमीवर फेटरी परिसरात श्री साई शिक्षण संस्थेद्वारा संचालित एनआयटी ग्रुपचे इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि एमबीए कॉलेज आहे. तसेच संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे नागपुरातील रामदासपेठ परिसरातील मिडास हाईट्स येथे आहे. सध्या या कार्यालयात माहिती देण्यासाठी कोणीही हजर नाही. संस्थेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत ईडीने देशमुख यांच्या मुलाची, सुनेची चौकशी केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

बातम्या आणखी आहेत...