आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीमुळे मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना मिळाली नुकसाभरपाई:28 कोटी 40 लाख बँक खात्यात जमा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यामध्ये आतापर्यंत ३५ जिल्ह्यांमधील एकूण ३९३९ संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३ लाख ५० हजार १७१ बाधित पशुधनापैकी एकूण २ लाख ६७ हजार २२४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.

उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधनापैकी २४ हजार ४३० पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ११ हजार २१४ पशुपालकांच्या खात्यांवर २८ कोटी ४० लाख रूपयांची नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ५ डिसेंबर अखेर एकूण १४४.१२ लाख लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३९.४२ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे १०० % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

लम्पी चर्म रोगाबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय/जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.

लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...