आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या दुसऱ्या महिला विभागीय आयुक्त:विजयालक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती, यूपीएससीमध्ये देशातून होत्या टाॅपर

प्रतिनिधी/नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी या नागपूरच्या नव्या विभागीय आयुक्त असतील. राज्य सरकारने शुक्रवारी केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांची नागपुचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

वीरप्पनला ठार करणाऱ्या अधिकाऱ्याची मुलगी

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन यांना ठार मारणारे आयपीएस शंकर महादेव बिदरी यांच्या विजयालक्षमी या कन्या आहेत. त्यांचे वडील शंकर बिदरी कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक होते. यापूर्वी प्राजक्ता लवंगारे वर्मा या नागपुरच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त म्हणून आल्या होत्या. त्यानंतर माधवी खोडे चवरे यांच्याकडे प्रभार होता. विजयालक्षमी बिदरी जुलै २०११ मध्ये कोल्हापुरच्या आयुक्त होत्या. २००२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉपर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण भारतीय महिला आहे.

घरात आयपीएसची परंपरा

बिदरी यांच्या घरात आयपीएसची परंपरा आहे. त्यांची आई वगळता घरातील सर्व जण आयपीएस आहेत. शंकर बिदरी यांच्या सहा सदस्यांच्या एकाच कुटुंबातून पाच आयपीएस झाले आहे. विजयालक्ष्मी यांचे पती मल्लिकार्जुन प्रसन्ना, आयपीएस अधिकारी मुंबईत डीसीपी आहेत. त्यांचा मुलगा विजयेंद्र बिदरी तिरुनेलवेली येथे पोलिस अधीक्षक आहे. त्यांची पत्नी रोहिणी भाजीभाकरे या तमिळनाडूतील सेलम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आई उमादेवी व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या कुटुंबातील एकमेव नॉन-आयएएस आणि नॉन-आयपीएस व्यक्ती आहेत.

बातम्या आणखी आहेत...