आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद जनार्दन बनसोड (३२) या तरुणाने पंचायत समिती सदस्य मिथिलेश ऊर्फ मयूर उमरकर यांच्याशी झालेल्या वादातून बुधवार २७ मे रोजी दुपारी विष प्राशन केले. उपचारादरम्यान गुरुवार २८ जून रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. मयूर ऊर्फ मिथिलेश उमरकर विरुद्ध जलालखेडा पोलिस ठाण्यात कलम ३०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपींना राजकीय दबावामुळे अटक करण्यात येत नसल्याचा आरोप मृताचे नातेवाईक तसेच बहुजन आघाडीने केला आहे.
नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य उमरकर हे गॅस एजन्सी चालवतात. त्या एजन्सीच्या ऑफिसचे बुधवार २७ मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान पिंपळदरा येथील अरविंद जनार्दन बनसोड याने मोबाइलद्वारे फोटो काढले. ऑफिसचे फोटो का काढले, यावरून मयूर उमरकर आणि अरविंद यांची बाचाबाची झाली. वादामुळे अरविंद याने कीटकनाशक खरेदी करून तिथेच रस्त्यावर कीटकनाशक प्राशन केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात अजूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसून ते जामिनावर बाहेर आहेत.
पंचायत समिती सदस्य मिथिलेश ऊर्फ मयूर उमरकर यांचे वडील बंडोपंत उमरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असून ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे मयूर उमरकर याला वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणून प्रकरण मिटवण्यात येत असल्याचा आरोप मृत अरविंद बनसोड याच्या नातेवाईकांनी केला.
उमरकर यांचे सदस्यत्व रद्द करा : अॅड. अांबेडकर
याप्रकरणी मिथिलेश उमरकर यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्यात यावे. तपास पूर्ण होईपर्यत कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली अाहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.