आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबलात्काराच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटून आलेल्या आरोपीने आठवडा भरातच दुसऱ्या एका मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. समीर बहार आलम सिद्धीकी या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली असून तो कुख्यात गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातीची फळे तयार करण्याचा शाळेने दिलेल्या उपक्रमासाठी काही मुले मुली माती गोळा करण्यासाठी फिरत होते. शाळेकडून विद्यार्थ्यांना मातीची फळे तयार करण्यास सांगितले होते. पीडित चिमुकलीसह वस्तीतील काही मुले व मुली माती जमा करण्यासाठी फिरत होते. कळमना परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेची 7 वर्षांची मुलगीही 7 एप्रिलला सकाळी 10 वाजता त्या मुला-मुलींसोबत फिरत होती. यादरम्यान पीडित मुलगी मागे राहिली. हे पाहून वासनांध आरोपी समीर सिद्धीकी याने तिला हेरले. ‘बेर खिलाता हू’ असे म्हणून परिसरात असलेल्या एका पडक्या टिनाच्या शेडमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. लहान बहीण दिसत नसल्याचे तिची मोठी बहीण शोधाशोध करीत असताना ती त्या पडक्या घरात गेली. तेथे आरोपी बलात्कार करीत असल्याचे तिला दिसले.
कोणाला काही सांगितले तर मारण्याची धमकी आरोपीने दिली. घाबरलेल्या अवस्थेत दोघीही मुली घरी आल्या. घरी आल्यानंतर मोठ्या मुलीने आईला बहिणीसोबत घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.