आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रामटेक तालुक्यातील पारशिवनी येथे माकडांचा खूप त्रास आहे. येथे माकडांनी अक्षरश: हैदाेस घातला आहे. वन खात्याने सापळा लावून या माकडांना पकडले. त्यातील एका माकडीणीच्या मातृत्वाने सारेच गहीवरले…
पारशिवनी येथे सापळे रचून या उच्छादखोर माकडांना पकडण्यात आले. त्यात टोळीसोबत असलेले हे पिल्लूही होते. नेमके हे पिल्लू आणि त्याची आई वेगवेगळ्या पिंजऱ्यात कैद होते. माकडीण पिलासाठी आणि पिल्लू आईला भेटण्यासाठी कासावीस झाले…ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्याही हे लक्षात आले होते. कारण माकडीणीची चिडचिड खूप वाढलेली होती. पिंजऱ्याजवळ आलेल्या कर्मचाऱ्याच्या अंगावर ती धावून जात होती.
एक दीड महिन्यांपूर्वी गावात धुमाकूळ घालीत लोकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या बदमाश माकडांच्या टोळीसोबत आई व पिलाची ताटातूट झाली होती. हे लक्षात आल्यावर दोघांना एकत्र करायचे ठरवले. दोघांचे पिंजरे जवळ आणून पिल्लाला माकडीणीच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. आईजवळ येताच पिल्लू माकडीणीच्या पोटाला घट्ट बिलगले. माकडीणीनेही त्याला घट्ट धरून ठेवले. पिल्लाला भेटल्याचा आनंद तिचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पाॅवरफुल औषध म्हणजे आईला मारलेली मिठी आहे, हे यातून पुन्हा एकवार दिसून आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.