आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला जन्म देताच आईने घेतला जगाचा निरोप:प्रसूती काळात महिलेचा मृत्यू; बाळ सुखरुप, नरखेड ग्रामीण रुग्णालयातील घटना

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मतःच आईपासून बाळाला पोरके व्हावे लागल्याची घटना नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली. त्यात जन्म दिलेले बाळ सुखरूप असून जन्मदातीचा मात्र मृत्यू झाला आहे. शालिनी सुरज ढोके (वय 33) यांना रात्री 2 वाजता प्रसूती वेदनांमुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड याच्या देखरेखीखाली रात्री 1ः45 वाजता डिलिव्हरी नॉर्मल झाली. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुले मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे.

प्रसूती झाल्यानंतर रक्त प्रवाह थांबत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी त्यावर उपचार सुरू केले. तरीही रक्त प्रवाह थांबत नसल्याने व शालिनीची प्रकृती खालावत असल्यामुळे डॉक्टरनी तिला योग्य वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरला रेफर केले. मात्र प्रकृती अतिशय खालवल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला काटोल येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.

पतीने केली तक्रार

शालिनीचा मृतदेह काटोल येथून नरखेड ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी पाठविण्यात आला. मृत महिलेचे पती सुरज ढोके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्याची सखोल चौकशी करून डॉक्टरावर कार्यवाईची मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

अधिकारी म्हणाले-डॉक्टरांचा दोष नाही

नागपूर येथून घटनेची चौकशी करण्याकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मडावी व डॉ. संजय उजैनकर आले होते. त्यांनी सांगितले, 30 ते 33 वयाच्या महिलाची प्रसूती ही हायरिस्क वर्गवारीत मोडली जाते. त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या कालावधीला सुवर्ण काल समजला जातो. परंतु धोकाही जास्तच असतो. परंतु येथील डॉक्टर, नर्स यांनी केलेली प्रसूती व त्या अनुषंगाने तयार केलेला रुग्णाबाबतचा रेकॉर्ड योग्य असून प्रसुतीची क्रिया योग्य तऱ्हेने पार पडल्याचे दिसून येते असे स्पष्ट केले आहे.

स्त्रीरोग तज्ज्ञाची मागणी

ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे गरोदर माताची परवड होते. जवळपास सुसज्ज सरकारी दवाखाना नसल्यामुळे गरोदर मातांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...