आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौन सोडले:माझे निलंबन करणे हे षडयंत्र, वेळेआधी माझे उत्तर शिस्तपालन समितीला पाठवेन- आशिष देशमुख

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे पक्षातून निलंबन करणे चुकीचे आहे. पक्षाच्या हिताच्या गोष्टी करत होतो. तरीही मला नोटीस पाठवण्यात आली. त्याचं उत्तर वेळेआधी मी शिस्तपालन समितीला पाठवेन. असे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सांगितले.

आशिष देशमुख यांना पक्षाविरोधात बोलल्याचा फटका आशिष देशमुख यांना बसला आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने तीन दिवसात कारणे दाखवा नोटीस देत पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.

नक्की आरोप काय?

'नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर असे गंभीर आरोप केले होते. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी केला होता.

हे पक्षाचे षडयंत्र

मला काँग्रेसच्या नागपुरात वज्रमूठ सभेनंतर राहुल गांधी यांची दुसरी सभा लगेच घेण्यात येत आहे. पक्षाचे हे षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राची सुरुवात विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला तेव्हापासून सुरू झालं. त्यासंदर्भात उत्तरात स्पष्टीकरण करेन. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं. ते संशयास्पद होतं. त्याचं उत्तर मी देईन, असंही आशिष देशमुख म्हणाले.

इतर पक्षात जाण्यात प्रश्नचा नाही

मी काँग्रेस पक्षात आहे. माझे जे काही उत्तर असेल ते काँग्रेस शिस्तपालन समितीला पटेल. त्यानुतर मला पक्षातून काढण्याची कारवाई करणार नाहीत. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही असेही ते म्हणाले.

शरद पवार हे मागच्या आठवड्यात आशिष देशमुख यांच्या शेतात येऊन गेले होते. त्यामुळे आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर देशमुख यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी देशमुख म्हणाले, सध्यतरी मी काँग्रेस पक्षात आहे. वेळेत शिस्तपालन समितीला उत्तर देईन. त्या उत्तरावर ते समाधानी होतील. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे देशमुख म्हणाले.