आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:भंडाऱ्यात आंदोलकावर प्राणघातक हल्ला

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा शहरातील शीतलामाता मंदिर रोड ते खाम तलाव चौकापर्यंत सिमेंट रोड बनवावा, या मागणीसाठी ४३ दिवसांपासून जय जवान, जय किसान संघटनेच्या माध्यमातून खाम तलाव चौकात साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी दुपारी अचानक एका जणाने आंदोलन पेंडॉलमध्ये बसलेल्या आंदोलनकर्त्या माजी सैनिक लक्ष्मण कनोजिया यांच्यावर दगडाने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.

भंडारा शहरातील शीतलामाता मंदिराजवळील बीएसएनएल कार्यालय ते खाम तलाव चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांना जीव गमवावा लागला तर, अनेक जण जखमी झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी नको, तर सिमेंट रस्ता बनवावा, अशी मागणी जय जवान, जय किसान संघटनेने केली असून त्याबाबत मागील ४३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी दुपारी लक्ष्मण कानोजिया हे अन्य उपोषणकर्त्यांस उपोषण पेंडॉलमध्ये बसले होते. या वेळी तिथे आलेल्या एका जाने काेणाला काही कळायच्या आत कनोजिया यांच्या डोक्यावर दगड मारला. यात ते जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. उपोषण करणाऱ्या संघटनेने पोलिस संरक्षण मागितले होते. काही दिवस संरक्षण मिळाल्यानंतर संरक्षण काढून घेतले. त्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भंडाराचे प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजी कदम हे आपल्या पोलिस पथकासह आंदोलनस्थळी पोहाेचले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हल्ला करणाऱ्या गोलू यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...