आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामदास पेठेतील अत्यंत वर्दळीच्या बिग बाजार माॅलला लागून असलेले स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी 5 लाख 82 हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बिग बाजार सारख्या वर्दळीच्या ठिकाणचे एटीएमही सुरक्षित नसल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच फाॅरेन्सिक टीम आणि बर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भादंवि कलम 380 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आरोपी दिसून आला. विशेष म्हणजे आरोपीने कोणतीही तोडफोड न करता एका चाबीच्या साहाय्याने कोड टाकून एटीएममधील कॅश काढली. बँकेने 14 जुलैला एटीएममध्ये कॅश भरली होती. यात एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा हात आहे का या दिशेनेही पोलिस तपास करीत असल्याची माहिती बर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.
दगडाने फोडले एटीएम
नागपुरात एटीएम फोडण्याच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वी जून 2018 मध्ये नागपूरमध्ये एका रात्रीत 3 एटीएम फोडल्या होत्या. ही तिन्हीही एटीएम एसबीआयची होती. जरीपटका भागातील सर्व एटीएम होते. हे एटीएम मध्यरात्री फोडण्यात आले होते. तसेच 13 जुलै 2021 रोजी नरेंद्र नगरातील स्टेट बँकेचे एटीएम दगडाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. दगड आणि पेचकसचा वापर करून या चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथून एक कार पास झाली. पोलिसांचे वाहन असल्याचे समजून चोरट्यांनी पळ काढला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.