आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयंकर घटना:नागपूरमध्ये बहिणीसोबत फिरायला गेलेल्या 5 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडल्याने मृत्यू

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमधील काटोल भागात एका पाच वर्षीय मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. विराज राजू जयवार असे मृत मुलाचे नाव आहे. काटोलमधील धंतोली या उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडली. विराजचे वडील राजू जयवार हे शेतकरी असल्याचे समजते.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा विराज रोजच आपल्या मोठ्या बहिणीसोबत फिरायला जात होता. शनिवारी सकाळच्यावेळी तो नेहमीप्रमाणे बहिणीसोबत फिरायला निघाला. त्याच वेळी भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. ते पाहून बहिणीने मोठमोठ्याने ओरडत लोकांना मदतीची विनंती केली, परंतु लोकांना तिचा आवाज ऐकू आला नाही. तोपर्यंत कुत्र्यांनी मुलाला ओढत एका बांधकामाच्या ठिकाणी नेले. तिथे त्याचे लचके तोडत गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला.

नागरिकांकडून संताप व्यक्त

घडलेल्या घटनेबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. केवळ काटोलच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. रात्री बेरात्री नोकरीवरून येणाऱ्यांनाही या कुत्र्यांचा प्रचंड त्रास होतो. त्यांची नसबंदी करण्याची मागणीही अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय.

बातम्या आणखी आहेत...