आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Attempt To Break Toilet Chamber And Dispose Of Expired Drugs, Demand Suspension Of Pharmacist Along With Hospital Medical Superintendent

औषधींची विल्हेवाट:शौचालयाचे चेंबर फोडून मुदतबाह्य औषधींची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकासह फार्मासिस्टला निलंबित करण्याची मागणी

चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शौचालयाच्या टाक्याचे चेंबर फोडून त्यात मुदत बाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आढळून आला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात राजुरा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व औषधी निर्माता (फार्मासिस्ट) यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राज्याचे आरोग्य मंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट कशी लावावी याची एक विशिष्ट पद्धत व नियमावली असताना रुग्णालय परिसरातील एका शौचालयाच्या टाक्याचे चेंबर जेसीपी ने फोडून त्यात या मुदत बाह्य औषधांची विल्हेवाट लावत असताना संतोष देरकर यांनी रंगेहात पकडले. शासनाच्या निर्देशांची पायमल्ली करीत आपल्या पदाचा गैरवापर करून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माता फार्मासिस्ट हे अनधिकृतपणे व अत्यंत घृणास्पद पद्धतीने मुदत बाह्य औषधांची विल्हेवाट लावत असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे निवेदन संतोष देरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. यावेळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने ती मुदत बाह्य औषधाच्या पिशव्या त्या टाक्यातून बाहेर काढून सदर प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुग्णालयातील मुदत बाह्य औषध कुठे व कशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही संतोष देरकर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...