आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न; 5 वर्षे सश्रम कारावास

गोंदिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर २०२० मध्ये एका निष्पाप मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोंदियाच्या विशेष न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

ही घटना १६ ऑक्टोबर २०२० राेजी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत घडली हाेती. आरोपी नेतलाल ठाकरे (४८) याने सिलेगाव तहसील गोरेगाव येथील फिर्यादीच्या घराला रंगरंगोटी करण्याचे कंत्राट घेतले होते. फिर्यादी आणि तिचा नवरा रोज कामावर जात होते आणि ८ वर्षांची मुलगी तिच्या आजीसोबत घरात राहत होती. घटनेच्या दिवशी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिच्या शरीराला वारंवार स्पर्श केला. पीडित मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला.

पीडित मुलीच्या आईने गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३५४, ५४३ (ए) आणि लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ च्या कलम १० अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक आर. टी. धारवाडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी न्यायालयात एकूण ६ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा न्यायाधीश-२ व विशेष सत्र न्यायाधीश गोंदिया यांनी १७ ऑगस्ट रोजी महत्त्वाचा निकाल देत आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...