आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडिओ क्लिप प्रकरण:फडणवीसांच्या राजकारणामुळे दु:खी झालो : गृहमंत्री देशमुख

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील “लेटर वाॅर’ने आराेप प्रत्यारोपाचे वेगळेच वळण घेतले

गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील “लेटर वाॅर’ने आराेप प्रत्यारोपाचे वेगळेच वळण घेतले आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना “हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचे संभाषण असणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी आपण १४ जुलै रोजी पाठवलेल्या पत्राची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. असे असताना “त्या’ व्यक्तीच्या कथित क्लिपचा आधार घेऊन प्रकरणाला विनाकारण राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नामुळे आपण दु:खी झाल्याचे देशमुख यांनी फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात म्हटल आहे.

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तेच गृहमंत्रीही होते. नगरसेवक ते मुख्यमंत्री हा फडणवीसांचा प्रवास अभिमानास्पद आहे. या राजकीय प्रवासात अनेकदा आपले राजकीय व प्रशासकीय पातळीवर सौहार्दपूर्ण संबंध राहिल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची काेणत्याही पातळीवरून वा तपास संस्थेमार्फत चौकशी करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.

या चौकशी प्रक्रियेवर आपला विश्वास नसल्यास आपण सुचवलेल्या राज्यातील कोणत्याही उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची तयारी आहे. या ऑडिओ क्लिपमधील आरोपीने गेल्या काही वर्षात काय काय काय प्रताप केले हे सुद्धा जनतेसमोर यावे, अशी आपली इच्छा असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...