आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाची शक्यता:कोबाड गांधीला पुरस्कार; नव्या वादाची शक्यता

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे नेते आहेत. कोबाड गांधी हे कानू सन्याल यांच्या नंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारे व आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते म्हणून ते ओळखले जातात. अशा नक्षल समर्थक नेत्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य शासनाचा अनुवादासाठीचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाल्याने नव्या वादाला ताेंड फुटण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अशोक पंडित आणि लेखक रतन शारदा यांनी ट्विट करत यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...