आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:59 गावांतील जागरूक ग्रामस्थांनी वेशीवरच कोरोनाचा संसर्ग रोखला

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर जिल्ह्यात ग्रामस्थांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती

कोरोनामुळे बहुतांश गावे तसेच शहरे बाधित होऊन मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच जिल्ह्यातील ५९ गावांनी प्रयत्नपूर्वक गावात कोरोना येण्यापासून रोखले. या गावांमध्ये मार्च २०२० पासून एकाही नागरिकाला कोरोनाची लागण झाली नाही. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेल्या उपक्रमामुळे या गावांत कोरोना पोहोचू शकला नाही, अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभावी उपायांमुळे बाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यात येथे यश मिळाले तरी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिक बाधित झाले. योग्य मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करतानाच गावातील स्वच्छता, सामाजिक अंतर तसेच मास्क घालण्याला प्राधान्य दिले आहे. इतर गावातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून कोरोनाची लक्षणे असल्यास प्रतिबंध घालणे आदी उपाययोजना या गावांनी केल्या.

५९ गावे कोरोनापासून दूर
जिल्ह्यातील १,६०५ गावांपैकी ५९ गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. या गावामध्ये मागील वर्षाच्या मार्चपासून एकही रुग्ण आढळलेला नाही अथवा कोणीही बाधित झालेले नाही. कोरोनला दूर ठेवणाऱ्या गावांमध्ये काटोल तालुक्यातील सर्वाधिक ११ गावांचा समावेश आहे. त्याबरोबरच नागपूर तालुक्यातील दहा गावांनी कोरोनाला थोपवण्यात यश मिळवले आहे. हिंगणा तालुक्यातील ११९ गावांपैकी ७ गावे, कळमेश्वर तालुक्यातील ८६ गावांपैकी ३ गावे, भिवापूर तालुक्यातील १०६ गावांपैकी २ गावे

कामठी तालुक्यातील ७८ गावांपैकी २ गावे, मौदा तालुक्यातील १२४ गावांपैकी ६ गावे, नागपूर तालुक्यातील १३४ गावांपैकी १० गावे, नरखेड तालुक्यातील ११८ गावांपैकी ४ गावे, पारशिवनी तालुक्यातील १०७ गावांपैकी १ गाव, रामटेक तालुक्यातील १५२ गावांपैकी ८ गावे, सावनेर तालुक्यातील १३६ गावांपैकी १ गाव तर उमरेड तालुक्यातील १३८ गावांपैकी ४ गावांनी अथक प्रयत्नांतून कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.

बातम्या आणखी आहेत...