आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागरूकता:मास्क वापराबाबतच्या जागरुकतेसाठी नागपूर पोलिसांचा अनोखा फंडा, 'कुछ कुछ होता है'च्या मीम सोबत दिला संदेश

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर पोलिसांनी ट्विटरवर मीमच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे बंधन तोडू नका... कारण बरेच काही घडू शकते."

कोरोना संसर्गादरम्यान मास्क घालण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अनोखे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी 1998 मध्ये आलेल्या शाहरुख खान अभिनित 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील एका फोटोचा वापर करत मास्क जागरूकतेचे एक मीम तयार केले आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून दिली हा संदेश 

ट्विटरवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये पोलिसांनी चित्रपटाच्या एका दृश्याचा वापर केला, ज्यात अभिनेता शाहरुख खानने काजोलला मिठी मारली आहे आणि सोबतच राणी मुखर्जीचा हातसुद्धा धरला आहे. पोलिसांनी मीममध्ये शाहरुखनला 'यू' (तुम्ही), काजोलला 'गोइंग आउट' (बाहेर जाणे) आणि राणी मुखर्जीला 'मास्क'चे नाव देत संदेश दिला की, बाहेर जाताना मास्क लावायला विसरू नका. नागपूर पोलिसांनी ट्विटरवर मीमच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे बंधन तोडू नका... कारण बरेच काही घडू शकते.'

नागपुरात घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी गेल्या महिन्यात घराबाहेर पडताना लोकांना मास्क घालणे बंधनकारक केले होते. पोलिस या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत आहेत. जे लोक विना मास्क घराबाहेर पडत आहेत त्यांना परत घरी पाठवले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...