आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालभारतीची रद्दीतून बक्कळ कमाई:अभ्यासक्रमातून रद्द झालेली पुस्तके लगद्यासाठी विकून 94 लाखांचे मिळाले उत्पन्न

नागपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य माणूस महिन्याच्या शेवटी रद्दी विकतो. वर्तमानपत्रे, घरातील अनुपयोगी वा मोडित निघालेल्या वस्तू विकून शेवटचा आठवडा साजरा करतो. त्यातून फारसे पैसे हाती लागत नाहीत ही गोष्ट वेगळी. मात्र, आता चक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीने अभ्यासक्रमातून रद्द झालेली पाठ्यपुस्तके लगद्यासाठी विकून चक्क 94 लाख 50 हजार 868 रुपयांची कमाई केली आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली.

किती पुस्तके विकले?

समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तके योजनेतंर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. तसेच खुल्या विक्रीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात मागील विक्रीचा अंदाज घेऊन अतिरिक्त 10 टक्के पाठ्यपुस्तकांची छपाई होते. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता दुसरी व अकरावी तसेच 2020-21 मध्ये बारावीचा अभ्यासक्रम रद्द झाल्यामुळे नवीन छापावी लागली. त्यामुळे रद्द झालेली पाठ्यपुस्तके लगदा तयार करण्यासाठी कागद गिरण्यांना विकली जातात. त्यानुसार 489.190 टन पाठ्यपुस्तकांच्या विक्रीतून बालभारतीला 94 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

गैरवापर टाळण्यासाठी

रद्द झालेल्या पाठ्यपुस्तकाचा गैरवापर टाळण्यासाठी म्हणून ही पुस्तके कागद गिरण्यांना विक्री केली जातात. सर्व शिक्षा अभियान ही भारतातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी एक बहुव्याप्त योजना आहे. ही योजना केंद्र शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमांपैकी एक आदर्श ( फ्लॅगशिप) योजना असून, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण निर्धारित कालावधीत प्राप्त करणे, हा तिचा मूळ उद्देश आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 2018-19 ते 2021-22 या कालावधीत सर्व शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यासाठी किती तसेच खुल्या बाजारात विक्रीसाठी किती पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पुरवठा, खुली विक्री व शिल्लक पुस्तकांची माहिती मागितली होती. यात बालभारतीला फक्त आकडे तेवढे द्यायचे होते. मात्र बालभारतीने आकडे देण्याऐवजी कोलारकर यांनाच 527 प्रतींसाठी प्रति प्रती 2 रुपये झेराॅक्स प्रमाणे 1094 रुपये पाठवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शिवाय रजिस्टर्ड एडीने पाठवायचे झाल्यास पॅकींगसह अतिरिक्त 1 हजार रुपये पाठवण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...