आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घोटाळे-गैरव्यवहार:देशात 84,545 हजार प्रकरणांत 1.85 लाख कोटींचे बँक घोटाळे, कर्मचाऱ्यांनी केला 1783 कोटी 22 लाखांचा अपहार

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक तक्रारी एसबीआयविरुद्ध

देशातील बँका व निवडक वित्तीय संस्थांत २०१९-२० या वर्षात संपूर्ण सुमारे ८४,५४५ घोटाळे-गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली आहेत. यात तब्बल १ लाख ८५,७७२.४२ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. सुमारे २६६८ कर्मचाऱ्यांनी १ हजार ७८३.२२ कोटी रुपयांचे घाेटाळे केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागवली होती. याशिवाय देशभरात १ एप्रिल २०१९ ते ३० जून २०१९ पर्यत ५६,४९३ व १ जुलै ते ३१ मार्च २०२० पर्यंत विविध बँकांविरोधात २,१४,४८० तक्रारी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्वाधिक तक्रारी एसबीआयविरुद्ध
१५ लोकपाल कार्यालयांना किती तक्रारी मिळाल्या याची माहितीही विचारली होती. एकूण २ लाख १४,४८० तक्रारी मिळाल्या. सर्वाधिक ६३,२५९ तक्रारी स्टेट बँक, १८,७६४ एचडीएफसी आणि तिसऱ्या क्रमांकावरील आयसीआयसीआयच्या १४,५८२ तक्रारी मिळाल्या.