आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचे माॅर्फ केलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आली. हा प्रश्न मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थित केला. ही चर्चा विरोधी बाकावरील सदस्यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटपर्यंत नेली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका 'एपीआय'ला चौकशी अंती निलंबित केल्याचे सांगितले. 'पीआय'ने योग्य तपास न केल्यामुळे त्याची बदली करून विशेष चाैकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.
जयंत पाटील यांनी भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचे छायाचित्र माॅर्फ करून टाकले आहे. त्यावर कारवाई करणार का, असे विचारले. त्यावर फडणवीसांनी हे छायाचित्र भातखळकरांनीच टाकले आहे का, हे तपासावे लागेल असे सांगितले.
अशोक चव्हाण यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर केलेली विधाने अजूनही कायम आहेत. ते अकाऊंट व्हेरिफाइड आहे. त्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला. उपमुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितले आहे. त्यामुळे त्यांना या संदर्भात पत्र पाठवणार आहोत.
प्रणिती शिंदे यांनी निर्भया फंडाबद्दल प्रश्न उपस्थित केला. या फंडातून वाहने खरेदी करण्यात आली. नंतर ती मंत्री आणि पोलिसांना देण्यात आली, असे सांगितले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना या सर्व गाड्यांची खरेदी झाली. त्याचवेळी या गाड्या सिक्युरिटीत तसेच आठ मंत्र्यांना देण्यात आल्या, असे सांगितले. मे २०२२ चा शासन निर्णय आहे. त्यामुळे हे आमच्या माथी मारू नका, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिलेकडे मंत्रिपद येणार
येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला मंत्री द्या, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली. महिला व बालविकास खात्याची मंत्री महिला असल्यास महिला आमदारांना संवाद साधणे सोपे जाते. या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यामुळे महिला मंत्री द्या, असे गायकवाड म्हणाल्या. त्यावर बोलताना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला मंत्री देऊ, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांतही कालबद्ध पद्धतीने विशाखा समिती स्थापन केली जाईल आणि दर्शनी भागात तसा फलक लावण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.