आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसरत:राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची बाजू सावरताना बावनकुळे यांची दमछाक

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरील राज्यात संताप थांबलेला नाही. मंगळवारी नागपुरात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यपालांची बाजू सावरताना बरीच कसरत करावी लागली. पदवीदान समारंभात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये. शरद पवार, नितीन गडकरी यांचा गौरव करणे ठीक आहे. पण, बोलताना छत्रपतींची प्रतिमा मलिन होईल असे बोलणे चुकीचेच आहे.

बातम्या आणखी आहेत...