आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासह तिघांना अटक:प्रियकराने दिली होती प्रेयसीच्या पतीची सुपारी, तिघांना अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जयताळा परिसरात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासात प्रेयसीच्या पतीची प्रियकराने सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी प्रताप नगर पोलिसांनी प्रियकरासह तिघांना अटक केली असून सुनील बाहेकर, खुमेश दमाहे आणि रोहित नागपुरे अशी या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजराज रामेश्वर डोमडे (३०, पन्नासे लेआउट, सोनेगाव) आणि ममता (२५) यांनी सहा वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह झाला होता. गोंदियातील आमगाव येथून दोघेही कामाच्या शोधात नागपुरात आले होते. दोघांचाही संसार सुरळित सुरू होता. त्यांना ५ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी आहे. भोजराज हा सेंट्रींगच्या कामावर जात होता. यादरम्यान, त्याचा मित्र सुनील बाहेकर याच्याशी ओळख झाली. दरम्यान सुनीलची नजर ममतावर पडली. दोघांची मैत्री झाल्यानंतर सूत जुळले. तीन महिन्यांपूर्वी भोजराज कामावरून अचानक घरी परतला. घरात त्याला सुनील आणि पत्नी दोघेही दिसले. त्यामुळे त्याने सुनीलला मारहाण करीत त्याच्याशी मैत्री तोडली होती. परंतु, पती भोजराज हा त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. भोजराजचा काटा काढण्याचा सुनीलने कट रचला. त्याने ममताकडून पतीबद्दल माहिती घेतली. व आरोपी खुमेश दमाहे आणि रोहित नागपूरे यांना १५ हजार रुपयांत सुपारी दिली. कटानुसार, रात्री १० वाजता भोजराजला दारू पाजण्याच्या बहाण्याने जयताळ्यात नेले. तेथे तिघांनी दगडाने ठेचून भोजराजचा खून केला. नाल्याच्या पाइपमध्ये मृतदेह लपवून ठेवला. सोमवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. ममताच्या सीडीआरमधून लागला तपास ः पती बेपत्ता झाल्यानंतर ममताच्या वागणुकीवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी ममताच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ काढला. त्यामध्ये पतीच्या बेपत्ता होण्याच्या वेळेत प्रियकर सुनील हा वारंवार संपर्कात होता, त्यावरून छडा लावला.

बातम्या आणखी आहेत...