आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीतकांडाचे सीसीटीव्ही फुटेज सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सादर केले आहे. मात्र, नर्सेसच्या वकिलांनी युक्तिवाद करताना फोटोत दिसत असलेला स्पार्क नसून तो ट्यूबलाइट चालू-बंद होत असल्याचा युक्तिवाद करून प्रकरणाला वळण दिले. यात आता न्यायाधीश सीसीटीव्ही फुटेज बघणार असून पुढील सुनावणी सोमवार, १५ मार्चला होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालय -१ चे विशेष न्यायाधीश पी. एस. खुने यांच्या न्यायालयात अॅड. कोतवाल यांनी बाजू मांडली आहे. दरम्यान, सरकारी वकिलाने या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज आणि काही फोटो न्यायालयात सादर केले होते. त्यावर शुक्रवारी दोन्ही नर्सचे वकील कोतवाल यांनी युक्तिवाद केला. यात बेबी केअर युनिटमध्ये ११ मिनिटे स्पार्क होत असल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला. तो स्पार्क नसून त्या युनिटमध्ये ट्यूबलाइट बंद चालू होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. सोबतच सीसीटीव्हीमध्ये आऊटबर्न युनिट दिसत नसल्याचेही नर्सेसच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तिथे ही दुर्घटना घडली असती आणि नर्सेस उपस्थित असत्या तर त्या जिवंत राहिल्या नसत्या, असा युक्तिवाद या वेळी नर्सेसच्या वकिलांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.