आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:भंडारातील आयसोलेशन वार्डमध्ये दोन कोरोना संशयिताचा मृत्यू, एक मधुमेही तर दुसरा कर्करोगाने होता ग्रस्त

भंडाराएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भंडारात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, मृतांचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवले

येथील शासकीय रुग्णालयात दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी समोर आली आहे. या दोघांनाही कोरोना संशयितांच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. याच दरम्यान दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यातील एकाचे वय 70 तर दुसऱ्या रुग्णाचे वय 50 होते. सोबतच, एकाला मधुमेह तर दुसऱ्याला कर्करोग देखील होता. या दोघांचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.

भंडारा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतकांचे स्वॅब सॅम्पल चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळेल. या दोघांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे, त्यांना 16 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये असलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्दी आणि खोकला असलेल्या या दोघांना इतरही आजार होते. यातील एका रुग्णावर आधीच एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला होता. यातील एकाचा मृत्यू शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास झाला. तर दुसऱ्याचे निधन शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीनंतर 12.30 वाजता झाले. 

बातम्या आणखी आहेत...