आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा:इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मुळेच चिमुकल्यांचा गुदमरून बळी,  जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवला हाेता प्रस्ताव

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिशू केअर सेंटरचे २०१७ मध्ये उद्घाटन झाले होते

भंडाऱ्यातील दहा चिमुकल्यांना कुस्करणारी यंत्रणा चाैथा दिवस उजाडला तरी बधिरपणाचं साेंग घेऊन बसली अाहे. याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फायर फायटिंग सिस्टिमचा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे परत आला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागाने त्यात दुरुस्ती करून पाठवण्याऐवजी तो धूळ खात ठेवल्याचा आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केला.

शिशू केअर सेंटरचे २०१७ मध्ये उद्घाटन झाले होते. त्यापूर्वीच तिथे फायर फायटिंगची व्यवस्था अद्ययावत करणे गरजेचे होते. मात्र, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक धकाते यांनी दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली. तसेच डॉ. खंडाते यांनी गतवर्षी पाठवलेला दुरुस्तीचा प्रस्तावही धूळ खात पडून आहे.

बांधकाम विभागाने १५% निधी द्यावा
सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यापूर्वी तेथे अग्निशमन यंत्रणा बसवली की नाही हे पाहणे गरजेचे असते. १५ टक्के इमारती या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आहेत. यामुळे देखभाल-दुरुस्तीचा १५ टक्के निधी आरोग्य विभागाला दिला तर सर्व कामे करून घेऊ. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

बातम्या आणखी आहेत...