आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Bhandara Fire Incident News And Update; Governor's Fund Provides Rs 2 Lakh Each To Bhandara Incident Victims' Families Bhagat Singh Koshyari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा आग दुर्घटना:राज्यपाल निधीतून भंडारा घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत- भगतसिंह कोश्यारी

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथ्या दिवशी आली चौकशी समिती; सुरक्षा व्यवस्थेची चार तास पाहणी

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून दहा निष्पाप जीव गेले. दरम्यान, या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना राज्यपाल निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 12 ते 17 जानेवारीदरम्यान नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवार, 13 जानेवारीला सकाळी 9 च्या सुमारास त्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिली. तसेच, यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

चौथ्या दिवशी आली चौकशी समिती; सुरक्षा व्यवस्थेची चार तास पाहणी

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या भीषण जळीतकांडाची चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती काल सकाळी भंडाऱ्यात दाखल झाली. या समितीने सुरुवातीला रुग्णालयाची पाहणी करून नंतर सुमारे चार तास चौकशी केली.

मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेली ही समिती दुपारी 3.30 पर्यंत तिथे होती. समितीने जळीतकांड झालेल्या शिशू कक्षासह रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर नर्स, डॉक्टर्स, अटेंडंट, इन्चार्ज यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. आगीचे नेमके कारण, रुग्णालयातील फायर एक्स्टिंग्विशर, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट तसेच इतर सुरक्षात्मक बाबींची चौकशी या समितीने केली. या चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे आयुक्त रामस्वामी, मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी. एस. रहांगडाले यांच्यासह इतर विभागांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीचा अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता

दरम्यान, ही चौकशी समिती रुग्णालयात असताना माध्यम प्रतिनिधींना त्यांच्याशी बोलू दिले गेले नाही. ही चौकशी समिती आपला अंतरिम अहवाल दोन दिवसांत राज्य शासनाला सादर करण्याची शक्यता आहे. अहवालानंतरच या घटनेतील दोषी कोण, याची माहिती मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...