आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा आग दुर्घटना:...तर ही दुर्घटना घडलीच नसती; भंडारा रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर

भंडारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शॉर्ट सर्किटमुळे आग, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. 9 जानेवारी रोजी रुग्णालायतील नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. सुन्न करणारी घटना ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली. त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती. तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे मत समितीने नोंदवले.

दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होणारच- राजेश टोपे

याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, 'रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हऑल प्रयत्नशील राहू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...