आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारी रुग्णालयांची गरज गोरगरिबांनाच लागते आणि हीच सरकारी रुग्णालये गरिबांचाच बळी घेतात याची वेदना भंडारा शहरातील सोनजारी टोळीत राहणाऱ्या विश्वनाथ बेहरेंच्या डोळ्यात दिसत होती. तीस वर्षांच्या विश्वनाथच्या पहिल्या पत्नीचा - कुंतीचा दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाला आणि आता त्याच्या दुसऱ्या पत्नीची - गीताची चिमुकली जन्मानंतर घरी येण्यापूर्वीच स्मशानात पोहोचली. भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात दगावलेल्या १० निरागसांमध्ये ती एक होती. या ११ निष्पापांचा बळी गेल्यावर आरोग्य संचालनालयाने दोन वर्षे प्रतीक्षेत असलेले १ कोटी ५३ लाख रुपये भंडारा जिल्हा रुग्णालयास पाठवले आहेत.
लोकांत भीती, सेवेवर संशय
भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दररोज सरासरी ३० ते ४० बालके उपचारासाठी दाखल होतात. दुर्घटना घडली त्या दिवशी सुदैवाने केवळ १७ बालके होती. मात्र त्या दुर्घटनेनंतर लोकांच्या मनात भीती व अविश्वास निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरात फक्त ७ बालके उपचारासाठी आली. विशेष म्हणजे या कक्षाच्या येथील बालरोगतज्ञ इन्चार्जसाठी परिसेविकांची मंजूर
भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दररोज सरासरी ३० ते ४० बालके उपचारासाठी दाखल होतात. दुर्घटना घडली त्या दिवशी सुदैवाने केवळ १७ बालके होती. मात्र त्या दुर्घटनेनंतर लोकांच्या मनात भीती व अविश्वास निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरात फक्त ७ बालके उपचारासाठी आली. विशेष म्हणजे या कक्षाच्या येथील बालरोगतज्ञ इन्चार्जसाठी परिसेविकांची मंजूर आगीत इन बोर्न आणि आऊट बोर्न या दोन्ही कक्षातील उपकरणे जळाल्यावर जिल्हा रुग्णालयात तात्पुरता कक्ष तयार करण्यात आला आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयातून इन्क्युबेटर ‘लोन’ म्हणून घेण्यात आले आहेत. ताब्यात घेताना चालू स्थितीत दिसणारी ही इन्क्युबेटर्स प्रत्यक्ष कामात ड्रीप होऊ लागल्याने ते बाजूला ठेवण्यात आले आहेत.
असलेली तीन पदे गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहेत. येथे कार्यरत बालरोगतज्ञ परिसेविका २०१२ मध्ये निवृत्त झाल्यापासून हा चार्ज जनरल परिसेविकेस देण्यात आला होता. दुर्घटनेच्या वेळी ड्यूटीवर नसताना तसेच माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन ७ बालकांना सुरक्षित बाहेर काढल्यावरही निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागल्याने या कक्षाचा चार्ज स्वीकारण्यासाठी अन्य परिसेविका आता तयार होत नाहीत.
सीएम फंड, राज्यपालांकडून मदत मिळाली, पीएमकडून अद्याप नाही : दुर्घटनेनंतर भंडारा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेहरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाख आणि शिवसेनेकडून १ लाख अशी ६ लाखांची मदत तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत या महिनाभरात पीडित कुटुंबांना मिळाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनची मदत अद्याप पोहोचलेली नाही.
दोन वर्षे दडवलेले १ कोटी ५३ लाख मंजूर
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निप्रतिबंध उपाययोजनेसाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडे पाठवलेला १ कोटी ५३ लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मंजुरी दिली असून ही रक्कम भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या खात्यावर वर्गही झाली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांच्या तपासासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले सील काढल्यावर या रकमेतून बालकांच्या अतिदक्षता विभागाची पुढील दुरुस्ती व उपाययोजनांचे काम सुरू होणार आहे. मात्र, यासाठी ११ बालकांना आपला जीव गमवावा लागला.
हॉस्पिटलमधला एकमेव फोटो हीच लेकीची आठवण
‘ती झाली तेव्हा कमी वजनाची होती. जन्मल्यापासून ती हॉस्पिटलमध्येच होती. घरी आणलेच नाही.. नावही ठेवलं नव्हतं तिचं ...’ विश्वनाथ सांगत होते. हॉस्पिटलमधला एकमेव फोटो एवढीच त्यांच्या निनावी लेकीची एकमात्र आठवण राहिली आहे. रडून रडून कोरड्या झालेल्या डोळ्यांनी तिचा तो एकमेव फोटो बघणं एवढंच त्यांच्या हातात राहिलंय.
शासनाकडून आलेला निधी
96 लाख उपकरणे खरेदीसाठी
13 लाख बांधकाम व दुरुस्तीसाठी
44 लाख फायर, इलेक्ट्रिक वर्कसाठी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.