आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवजात १० बालकांचे प्राण घेणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निकांड प्रकरणात दोषी डॉक्टर व इतरांवर फक्त निलंबन नव्हे तर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी, अशी मागणी आपली सात दिवसांची नवजात मुलगी गमावणाऱ्या वंदना मोहन सिडाम या मातेने केली आहे.
चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते निलंबित, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिता बढे यांची बदली, बालरोग तज्ञ डॉ.अर्चना मेश्राम, अधिपरीचारिका ज्योती भारस्कर निलंबित, बालरोग तज्ञ कंत्राटी डॉक्टर सुशील अंबादे, कंत्राटी नर्स स्मिता अंबिलढूके, शुभांगी साठवणे यांना सेवामुक्त केले आहे. सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर न थांबता या प्रकरणाची नि:पक्षपणे न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी वंदना यांनी केली. अपत्य गमावलेल्या एका दाम्पत्याने सांगितले की, कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच हे एक प्रकारचे बाल हत्याकांडच घडले आहे. यामुळे त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी मागणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.