आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा अग्नितांडव प्रकरण:भंडारा प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, राज्यातील सर्व रूग्णालयाचे फायर ऑडिट हवे : देवेंद्र फडणवीस

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भंडारा प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख ऐवजी 10 लाखाची मदत द्यावी, फडणवीसांची मागणी

भंडारा अग्नीतांडवप्रकरणी हलगर्जीपणा झाला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भंडाऱ्यात पोहोचले होते. जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. पण, सरकारकडून जे दावे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार केला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख ऐवजी 10 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...