आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जीपणाचे बळी:आग लागल्यानंतरही उशीरा पोहोचलेल्या नर्सने सांगितले- न्यूबॉर्न युनिटमध्ये सर्वत्र धूर पसरला होता एकही कर्मचारी नव्हता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • SNCU रात्री एक डॉक्टर, 5 नर्स ड्युटीवर असतात; घटनेच्या वेळी ते कुठे होते?

भंडारा जिल्हा रुग्णालयात भल्या पहाटे घडलेल्या हृदयविकारक घटनेत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. सिक न्यूबोर्न केअर युनिट (SNCU) मध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा बळी याच हलगर्जीपणाने गेल्याचे दिसून येते. यात 7 चिमुकल्यांना वाचवण्यात आले. परंतु, वेळेवर मदत मिळाली असती तर आणखी जीव वाचले असते.

जिल्हा शल्यचिकीत्सक प्रमोद खंडाते यांनी सांगितल्याप्रमाणे, "रात्री उशीरा 2 वाजेच्या सुमारास आग लागली. न्यूबॉर्न युनिटमधून आगीचा धूर निघत होता. नर्सने दार उघडले तेव्हा काही दिसणे कठीण होते. तिने वेळीच वरिष्ठांना याची माहिती दिली आणि कर्मचाऱ्यांनी मिळून नवजातांना बाहेर काढले. पण, तोपर्यंत 17 पैकी 10 चिमुकल्यांचा जीव गुदमरून गेला. तर 7 नवजातांना वाचवण्यात आले."

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचे पुरावे

  • ड्युटीवर असलेल्या नर्सने सांगितल्याप्रमाणे, रात्री 2 वाजता सिक न्यूबॉर्न केअर युनिटचे दार उघडले तेव्हा त्यामध्ये खूप धूर पसरला होता. त्या ठिकाणी एकही कर्मचारी नव्हता.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलेल्या काही मुलांच्या काचा काळ्या पडल्या होत्या. अर्थातच आग लागून बराच वेळ झाला होता. तोपर्यंत स्टाफला काहीच पत्ता नव्हता.
  • सिक न्युबॉर्न केअर युनिटमध्ये रात्री एक डॉक्टर आणि 4 ते 5 नर्स ड्युटीवर असतात. पण, घटनेच्या वेळी ते सगळे कुठे होते?
  • आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगराणी ठेवण्याचा नियम आहे. तरीही आग लागलीच कशी?
  • काही नातेवाइकांनी आरोप केला की त्यांना गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्या बाळांना पाहण्याची परवानगी दिली नाही. नियमानुसार, दूध पाजण्यासाठी किमान आईला पाठवले जाऊ शकते.
  • इतक्या लहान बाळांची काळजी घेण्यासाठी असलेल्या वार्डमध्ये स्मोक डिटेक्टर का लावले नाहीत? असते तर कदाचित चिमुकल्यांचा जीव वाचवता आला असता.
बातम्या आणखी आहेत...