आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी अक्षरशः कोपली आहे. नदीच्या पुराचा भंडारा शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुरामळे जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
3 दिवसांपासून अतिवृष्टी
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे वैनगंगा नदीसह जिल्ह्यातील अनेक नदीनाले दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी सुमारे 3 मीटरपेक्षा अधिक उंचीने ओलांडली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचे पुराचे पाणी भंडारा शहरातील टप्पा मोहल्ला, ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, टाकळी परिसरासह अनेक सखल भागांत शिरले आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मध्यरात्रीपासूनच जिल्हा प्रशासनाने सुरक्षितस्थळी शेकडो कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवले.
आंतरराज्य मार्ग बंद
वैनगंगा नदी फुगल्याने भंडारा शहरानजीक असलेल्या टाकळी पुलावरुन 4 फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे भंडारा बालाघाटकडे जाणारा आंतरराज्य मार्ग भंडारा शहरापासूनच बंद झाला आहे. यासोबतच मोहाडी शहराजवळील नाल्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानेपरिसरातील नागरिकांचाही तालुकास्थळाशी संपर्क तुटला आहे.
वाहनांच्या रांगा
भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 असून आंतरराज्यीय बालाघाट मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे तुमसरसह त्या भागात जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत.
प्रशासनासह पोलीस विभागाची दमछाक
3 दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी हे सातत्याने पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत. प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पुर बाधितांना दिलासा देत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मागील 3 दिवसांपासून पोलिस प्रशासन अत्यंत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. यात वाहतूक पोलिस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.