आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम:भंडाऱ्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून दोघांवर चाकूहल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

भंडारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणाच्या वादातून दोघांवर चाकूहल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या न्याहारवाणी रस्त्यावर घडली. यातल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आवेज हसन शेख (वय. २२, रा. ठाणा) असे मृताचे नाव आहे, तर श्रेयस मुन्ना वाहाणे (वय १८) जखमीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले. मात्र, अखेर त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

अशी घडली घटना

तन्वीर पठाण (वय २२) व त्याच्या साथीदाराने आवेज शेख याला याला फोन करून बोलावून घेतले. त्याच्यासोबत श्रेयस वाहनेही होता. हे दोघे निहारवाणी रस्त्यावर पोहचले. तेथे पठाण आणि शेखमध्ये बाचाबाची झाली. शेवटी राग अनावर होऊन तन्वीर पठाण आणि त्याच्या साथीदाराने दोघांवर चाकूहल्ला केला. आवेजची मान, पोट, हातावर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीवर आणले

श्रेयस गंभीर जखमी आहे. त्याने या हल्ल्याची मित्रांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आवेज व श्रेयस रस्त्यावर गंभीर जखमी पडलेले दिसले. या दोघांनाही दुचाकीवरून शहापूर येथील आरोग्य उपकेंद्रावर आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत आवेजचा मृत्यू झाला. सध्या श्रेयसवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहेत.

अखेर केले आत्मसमर्पण

आवेज आणि श्रेयसवर केलेल्या चाकूहल्ल्याची बातमी पंचक्रोशी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी त्यांच्या मित्रांनी धाव घेतली. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तन्वीर पठाण व त्याच्या साथीदाराने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे समजते.