आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:भंडाऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक, 31 डिसेंबरच्या रात्री पोलिस स्टेशनमध्ये केला होता राडा

भंडाराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणं भंडाऱ्याचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार कारेमोरे यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला होता. यासोबतच पोलिसांना शिवीगाळ देखील केली होती. आपल्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी हा राडा घातला होता. या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. या प्रकरणानंतर रविवारी कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र, आज पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली आहे. भंडारा पोलिसांनी त्यांना घरुन अटक केली आहे.

नेमके प्रकरण काय?
आमदार राजू कारेमोरेंचे दोन व्यापारी मित्र रात्री आमदाराच्या घरुन 50 लाखांची रोकड घेऊन आरटीका गाडीतून तुमसरकडे जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टँग रुमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही असे म्हणून गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली. गाडीमधील यासीम छवारे आणि अविनाथ पटले या दोन व्यक्तींना याविषयी विचारणा करण्यात आली. मात्र यावेळी त्यांच्यात आणि पोलिसात बाचबाची झाली. यामुळे पोलिसांनी दोघांनाही मारहाण केली. दरम्यान पटले याणि छवारे यांच्या जवळचे 50 लाख रुपये आणि सोन्याची चेन पोलिसांनी पळवली असल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी दिली आहे. यानंतर पोलिस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेऊन तपास सुरु केला. यानंतर कारेमोरे यांनी पोलिस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना दमदाटी केली आणि शिवीगाळ करत राडा घातला होता.

बातम्या आणखी आहेत...