आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्यातील साकोली शहराजवळच अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला आहे. मोना टायर इंड्रस्ट्रिज समोर महामार्गावर रविवारी (19 मार्च) पहाटे दरम्यान बिबट्याचा बछडा रस्ता ओलांडत असताना वाहनाने बिबट्याला चिरडले.
अज्ञात वाहनाने चिरडले
आज सकाळी 6 दरम्यान बिबट्याचा बछडा राष्ट्रीय महामार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे रोड ओलांडून जात होता.यावेळी अज्ञात ट्रकने त्यास चिरडले. त्यातच डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने जागीच बछड्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांना प्रथम मिळताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस, वन अधिकारी दाखल झाले असून चौकशी सुरू केली आहे. बिबट बछडा हा किमान अवघ्या वर्षाचा असून जंगलमार्गानी अन्नशोधात भरकटला होता. त्याचवेळी तो महामार्गावरील परिसरात आला होता असा अंदाज आहे.
साकोली महामार्गावरील घटना
यापूर्वी 2 मार्च 2023 रोजी शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग 53 पार करणाऱ्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी – साकोली महामार्गावर मुंडीपार सडकजवळ असलेल्या धाब्याजवळ रात्री 11.20 वाजताच्या सुमारास घडली होती.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली राष्ट्रीय महामार्ग 53 (जुना राष्ट्रीय महामार्ग ६) वरील वन्यजीव भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. अशातच 20 नोव्हेंबर 2022 मध्ये एका बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. शिवाय मागील महिन्यात याच परिसरात एका बिबट्याचा मृतदेह आढळला होता. लागोपाठ झालेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.