आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा27 फेब्रुवारी रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा वा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयांतून विविध उपक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु भंडाऱ्यातील लाल बहादुर शाळेने "शिव्यांकडून ओव्यांकडे...' अशी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एक वेळ ओव्या लिहिण्याची स्पर्धा ठिक आहे. पण सोबत शिव्याही लिहायच्या म्हणजे काय आहे हे अनेकांना समजले नाही. कारण होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला शिव्या दिल्या जातात. मनातली सारी गरळ ओकली जाते. पण, शिव्या लिहायच्या हे अतिच झाले की, अशीच अनेकांची भावना होती.
ओव्या गाव्यात, श्लोक म्हणावेत, पोवाडे, जोगवा,भारुडे आवेशात म्हणावीत. कुसुमाग्रजांचे काव्य शोधावे, वाचावे. पण शिव्या लिहायच्या म्हणजे विचित्र वाटणारचना. पण या स्पर्धेत शिव्यांसोबत ओव्याही लिहायच्या आहे. सहजपणे शिवी देणारे, वाईट बोलणारे आढळतात. संकोच वाटावा अशा शिव्या. प्राणी,रंगरुप,शरीरयष्टी वरुन बोलली जाणारी संवाद भाषा खरेच फार सभ्यतेची नसते. ओबडधोबड दिसणारा ऊसही रसाळ असतो. हे संतवाक्य आठवू. सत्तावीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत हा उपक्रम सुरु राहिल.
गुगलवर शोधायच्या आहे ओव्या
यासाठी गुगलवर ओव्या शोधायच्या, संतकाव्य शोधायचे आणि ते सुवाच्च अक्षरात लिहायचे. जितक्या आठवतील तेवढ्या शिव्या पण लिहायच्या. होळीच्या दिवशी या शिव्यांचे कागद होलिकादेवीला अर्पण करुन वाईट बोलणे सोडून द्यायचे. निग्रहपूर्वक असे केले तर हे सहज साध्य होईल. यातील ओव्यांचा स्वीकार करायचा आणि शिव्या जाळून टाकायच्या. शिव्या लिहिताना संकोचू नका. ते कागद आयोजकांकडे राहतील. कोणाचीच मानहानी होणार नाही. नाव जाहीर केली जाणार नाहीत. ओव्या लिहिणाऱ्यांना मात्र वाचस्पती पुरस्कार मिळणार आहे. येत्या ५ मार्चपर्यत स्पर्धा सुरू राहाणार आहे. स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन भंडारा येथील लाल बहादुर शास्री विद्यालयाच्या मराठी भाषा विभागाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.