आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे ‘अंबरग्रीस’ तस्करी करणाऱ्या चार जणांना नागपुरात पकडण्यात आले. त्यांच्याकडून अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून अशा प्रकारची ही नागपुरातील पहिलीच कारवाई ठरली. वन विभागाने सापळा रचून नागपूर शहरातल्या गणेशपेठ परिसरातून याप्रकरणी अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहुल दुपारे व प्रफुल्ल मतलाने यांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. व्हेलची शरीरातून उलटी पाण्यात तरंगते. सूर्यकिरण व समुद्रातील क्षारमुळे रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे अंबरग्रीसमध्ये रूपांतर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.