आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर पोलिस अ‍ॅक्शन मोडवर:जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्यांना अटक, बर्डी पोलिसांची कारवाई

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांना एमडी पकडण्याची टिप दिल्याच्या संशयावरून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करणाऱ्यांना बर्डी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. गुरूवार 9 जून रोजी अजनी ठाण्यातंर्गत गुन्हे शाखेने एमडीसह एका आरोपीला अटक केली.

टेकडी रोड गवळीपुरा येथील ऋषभ कमल मिश्रा (वय 27) यानेच पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून आरोपी अशफाक खान (वय 20), अरमान खान अहमद खान (वय 22), साहिल शेख (वय 21) तसेच ललित संदीप जयस्वाल (वय 20) यांनी ऋषभला फोन करून बोलावले.

गुरुवारी रात्री ऋषभ आरोपींना भेटायला जाताच त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. अशफाकने ऋषभला जीवे मारण्याची धमकी दिली. ऋषभने बर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहाता पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला असता एका गल्लीत तीनही आरोपी मिळून आले. आरोपी अशफाक व अरमानजवळ डुक्कर चाकू सापडला.

बातम्या आणखी आहेत...