आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजपर्यंत आपण सुपरमॅन, स्पायडरमॅन व पॅडमॅनच्या कथा व चित्रपट बघितले असतील मात्र सध्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील 'बर्डमॅन'ची मोठी चर्चा सुरु आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सुमेध वाघमारे हा युवक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला. लहानपणापासून त्याने शेळ्या राखण्याचे काम केले. मात्र एक दिवस त्याच आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याला मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून प्रेरणा मिळाली. झाडांना वाचवण्यासाठी शिंदे यांनी एक चळवळ सुरू केली व ती आजही सुरू आहे. यातून सुमेधने प्रेरणा घेतली.
सयाजी शिंदे यांचा आदर्श मनात बाळगून सुमेधने पक्षी व त्यांच्या विविध आवाजावर लक्ष केंद्रित करत, मानवी जीवनापासून त्यांना किती धोका आहे व त्यातून त्यांना कसे वाचवायचे याबाबत एक मोहीम सुरु केली.
असंख्य नागरिकांपर्यंत पोहचली
शेळ्या राखत असताना सुमेधने पक्ष्यांचे आवाज काढणे सुरू केले. असे करता करता तो तब्बल 200 पक्ष्यांचे आवाज काढू लागला. त्यानंतर आपण सुरू केलेली चळवळ ही असंख्य नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी तो कार्यरत होता, विविध ठिकाणी तो याबाबत कार्यक्रम घेत नागरिकांना पक्ष्यांबाबत माहिती देऊ लागला.
200 पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात
एक ताडोबा अभयारण्य येथे विविध कंत्राटी जागेकरीता जाहिरात निघाली. ती जाहिरात बघून सुमेध चंद्रपुरात आला. मात्र त्यांच्यातील कला बघता ताडोबा क्षेत्रातील सहायक उपसंचालक जितेंद्र रामगावकर यांनी सुमेधला नॅचरलिस्ट या पदावर नेमणूक केली. ताडोबामध्ये कार्यरत असलेले सुमेध वाघमारे हे तब्बल 200 पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात.
चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा यासह 200 हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे. या माध्यमातून ते निसर्गाला वाचवण्याचा संदेश देत असतात.
जनजागृती करण्याचे काम
आता सुमेध ताडोबा येथे वाघाला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्याबाबत माहिती देत जनजागृती करण्याचे काम सुरू केले. पक्ष्यांबाबत माहिती देताना सुमेध हा विविध पक्ष्यांचे आवाज काढतो, अनेकांना पक्ष्याचे नाव सुद्धा माहीत नसते, सुमेध च्या माहितीनंतर पर्यटकांना पक्ष्याबाबत नवी माहिती कळते.
माझी ही मोहीम सुरू राहील
सुमेध यांनी सांगितले की, जंगलात पर्यटक फक्त वाघ बघायला येतात मात्र जंगलात वाघ हा एकमेव प्राणी नाही, सोबत अनेक वन्यप्राणी व पक्षी या जंगलात राहतात, त्यामुळे जंगल हे समृद्ध आहे. सुमेध चे एकच लक्ष्य आहे की माझ्या माहितीनंतर पक्षी वाचला पाहिजे, यासाठी माझी ही मोहीम सुरू राहील अशी माहिती सुमेध ने दिली आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.