आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गडबड:बिशप प्रेमचंद्र सिंग यांना नागपूर विमानतळावरून अटक

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर येथील नाॅर्थ इंडिया बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्चचे बिशप प्रेमचंद्र सिंग ऊर्फ पी. सी. सिंग यांना सोमवारी नागपूर विमानतळावरून अटक केली. जबलपूरमधील ख्रिश्चन गुरू पी. सी. सिंग हे मूळचे बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील चांदसुरारी गावचे आहेत.

बिशप प्रेमचंद्र सिंगच्या अटकेसाठी त्याचे परदेशातून परतणे आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती. सोमवारी नवी दिल्लीहून बंगळुरूमार्गे नागपूरला पोहोचल्यावर सीआयएसएफच्या मदतीने बिशपला नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. सध्या ईओडब्ल्यू आणि इतर एजन्सी त्यांची चौकशी करत आहेत.

जबलपूरमध्ये गेल्या आठवड्यात ईओडब्ल्यूने बिशप पी. सी. सिंगच्या घरावर छापा टाकला. ट्रस्ट संस्थांच्या लीज नूतनीकरणात फसवणूक करणे, ७ कोटींहून अधिक कर न भरणे अशी प्रकरणे समोर आली आहेत. बिशपच्या घरातून दीड कोटींच्या रोकडसह अनेक मालमत्ता उघडकीस आल्या. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. सिंग याच्या ठिकाणांवरील छाप्यांत ईओडब्ल्यूला १ कोटी ६५ लाख रुपये रोख आणि १८ हजार डॉलर्सचे विदेशी चलन, ९० लाख रुपयांच्या आलिशान कारसह ९ कार, विजयनगरमध्ये दोन किलो सोने आणि काळा पैसाही सापडला. संस्थांच्या कागदपत्रांव्यतिरिक्त १७ मालमत्तांची कागदपत्रे, ४८ बँक खातीही प्राप्त झाली असून त्यानंतर बँकांकडून तपशील काढला जात आहे.

१० राज्यांमध्ये एफआयआर दाखल आर्थिक गुन्हे पथकाच्या छाप्यानंतर उत्तर भारतातील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पी. सी. सिंग ऊर्फ प्रेमचंद्र सिंग यांच्याविरोधात भारतात सुमारे ९९ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, हरियाणा आदी राज्यांतही गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...