आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडिया ऑडिट केले असून यापुढेही करणार आहे. ९ जिल्हाध्यक्षांचा अतिशय चांगला रिपोर्ट आहे. ५ जण सरासरी उपयाेग करतात. तर ३१ जण खूपच निष्क्रिय आहे. आणि १५ जणांचे समाज माध्यमांवर अस्तित्वच नाही. आपली खरी लढाई विरोधकांशी नसून ते तयार करत असलेल्या रचलेल्या (नॅरेटिव्ह) कथानकाशी आहे. यापुढे समाज माध्यमांवर निष्क्रिय राहून चालणार नाही, अशी कानउघाडणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधकांमध्ये आपल्याशी लढण्याचा राजकीय दम नाही. त्यामुळे आपली लढाई विरोधकांशी नसून ते रचत असलेल्या कपोलकल्पित कथानकाविरोधात आहे. त्यासाठी समाज माध्यमांवर कमालीचे सक्रिय राहावे लागेल. या नॅरेटिव्हरला पराभूत करण्यासाठी सामूहिकतेने लढावे लागेल. काही आमदारांच्या फेसबुकवर आठ आठ दिवस पोस्ट येत नाही. तर काहींचे ट्विटर हॅंडल सुरूच नाही. मात्र याउलट सामान्य कार्यकर्ते कमालीचे सक्रिय असून ते निकराने ही लढाई लढत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आपल्याला जिंकायचे असेल तर खोटे कथानक रचण्याचा डाव उलथवून टाकावा लागेल असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.